शब्दांच्या पलिकडेही एक जग असतं,
तुझ्या मिठीत आल्यावर ते दिसू लागतं,
तिथे समुद्राला नदी येऊन भेटते,
हे सौंदर्य पहायला आपल्याला पापणी मिटावी लागते...
तिथे किनार्यावर एकच नाव असते,
आपला संसार पूर्ण करण्या ती पुरेशी असते,
आपल्याला शुभेच्छा देण्या चंद्र आलेला असतो,
निळाई चांदण्याण्ची आपल्यावर पुष्प वर्षाव करत असते...
सकाळी सूर्य नवी उमेद घेऊन येतो,
आपण इथे कायम सुखीच राहणार याची हमी देऊन जातो,
तू माझ्याशी खोटं - नाटं भांडत नाही,
मीही तुझ्यावर खोटं - नाटं रुसत नाही...
सागर आणि सरितेचा मेळ जिथे होतो,
संगमाच्या त्या ठिकाणी आपण असतो,
न्याहाळत त्यांच्या प्रेमाला आपणही जवळ येतो,
मिठीत एकमेकांच्या स्वतःला संपवत जातो,
मिठीत एकमेकांच्या स्वतःला संपवत जातो...
-प्रेयसी
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
वा स्नेहा, अतिशय सुंदर आणि तरल काव्य !
Post a Comment