Monday, March 19, 2007

शब्दसुरांच्या झोपडीत...

शब्दसुरांच्या झोपडीत या,
कधी प्रिया तू येशील का?
साद घालता गंधाराची,
पंचमाकडे नेशील का?
व्याकरणात मी चुकता तू,
गोड धपाटा देशील का?
द्वंद्वगीत गाऊन जगाला,
प्रीत आपली दावशील का?
अनूभवांची भेट देऊन,
कवितांमधून बहरशील का?
सूर मागता मी तुझ्याकडे,
आस त्यांची होशील का?
मूर्ख स्वरांना,बेसूर शब्दांना,
तु अचूक बनवशील का?
सुख तुजला मी देता,
समाधान मजला देशील का?
शब्द्सुरांच्या या झोपडीला,
प्रेमाचं महाल बनवशील का?
शब्दसुरांच्या झोपडीवर तू,
आयुष्य तुझे उधळशील का?

-प्रेयसी!

2 comments:

Unknown said...

we are supoose to do these kind of reqest to our
Dev sir


in last sentance ie
Aayushya tujhey Udhadshil kaa
ithink so it should be aayushya majhey udhadshil kaa
dats what i feel no doubt poem is as usual nice

अरविंद said...

स्नेहा नावाची प्रेयसी प्रियकराला सांगते-
मी तुला सुख देईन, तू मला समाधान देशिल का ?
झोपडीची परीणिती महालात करशिल का ?

बस ! या मुलीच्या प्रतिभेला तोड नाही.
माझी भाची खूप ग्रेट..तुम्हाला नाही वाटत का ?