कधीतरी माझे श्वास ऎक,
प्रत्येक उच्छ्वासाला तुझंच नाव घेतात ते!
कधीतरी माझ्या एकांताला भेट,
तू जितका स्वतःचा नसशील ,
तितका माझ्या एकांताचा झाला आहेस!
कधीतरी माझे ह्रदयकंप ऎक,
तुझ्याच ह्र्दयकंपाचा नाद ऎकू येईल तुला!
कधीतरी माझ्या डोळ्यांत बघ,
तुझंच रूप दिसेल तुला!
कधीतरी हातात हात घे माझा,
तुझ्या स्पर्शासाठी आतुर या शरीराने,
तुला नाही गारठवलं, तर सांग मला!
कधीतरी माझ्याकडे प्रेमाने बघ,
त्या एका द्रुष्टिक्शेपाने तुला,
माझ्या प्रेमात नाही पाडलं,तर सांग मला!
-प्रेयसी!
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
ही आतुर प्रेयसी कोणालाही खुळं करेल, बिचार्या त्या प्रियकराची काय कथा !!
Post a Comment