सतत खळखळणारं, हास्य आहेस तू,
झुळुझुळू निर्झराचं, गान आहेस तू....
हसत असतात तुझे डोळे,
तुझ्या चेह-याचा गोडवा वाढवत.
तू हसतेस, तुझे डोळे हसतात
तू पाहतेस, तुझे डोळे पाणावतात
त्या पाणावलेल्या डोळ्यांतून,
स्नेह सारखा पाझरत असतो.
त्या हस-या डोळ्यातून,
आत्मियता बरसत असते.
त्या सुन्दर डोळ्यातून,
आपुलकी थेंबावत असते.
तुझे डोळे निरखतात, पारख करतात-
वाईट नजर, आत्मिय नजर,
कॊणते खरे, काय खोटे..
तरी बरसतच असतात तुझे डोळे---
फक्त आपुलकी--
फक्त आत्मियता--
फक्त स्नेहच--
फक्त आनंदच
तुझे मोहक, सुन्दर लबाड डोळे
---हसत असतात
--हितगुज करतात
--गोड गोड बोलतात
तुझ्या लोभस डोळ्यांनी,
तुला भरभरून दिलं आहे.
तू अशीच हसत रहा.
तू अशीच फुलत रहा.
तू अशीच फुलवत रहा.
त्या डोळ्यांना जपत रहा
स्नेहा, सतत तू हसत रहा...
--------- अरविंद
Saturday, June 23, 2007
Subscribe to:
Posts (Atom)